यावल येथील तहसील कार्यालयाच्या समोर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसह विविध मागण्याकरिता मूक आंदोलन केले, व तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे संघटनेचे अध्यक्ष हरी पाटील यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येत प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.