सांगली जिल्हापरिषदेचे नूतन सीईओ विशाल नरवाडे यांनी लेट कमर्स कर्मचाऱ्यांना झटका दिला आहे. मंगळवारी सकाळी 9 वाजून 45 मिनिटानंतर मुख्य गेटला कुलूप लावून स्वतः विशाल नरवाडे यांनी गेटबाहेरील उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले. उद्यापासून वेळेत कार्यालयांमध्ये यावे अन्यथा कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा त्यांनी दिल्याने जिल्हापरिषद वर्तुळातून एकच खळबळ माजली आहे. स्वतः सीईओ विशाल नरवाडे हे कार्यालयात लवकर हजर होऊन उशिरा कार्यालयात दाखल होणाऱ्या कर्मचार्यांना दणका दिल्याने मात्र साऱ्या