साक्री तालुक्यातील गणेशपूर येथील केंद्रीय निवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना अचानकपणे थंडी, तापसर्दी खोकला आजाराने ग्रासल्याने ६१ विद्यार्थी, विद्यार्थिनींना साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर सोनाली सुनील पावरा वय १२ रा. खरवड ता. धडगाव जिल्हा नंदुरबार या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.दरम्यान चार विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली असून खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.