ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत दिग्रस तालुक्यात अनेक वेळा ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला व पुराचे पाणी थेट शेतात शिरल्याने शेतकऱ्यांच्या हातात आलेले पिक पाण्यात वाहून गेले. मुसळधार पावसामुळे तूर, सोयाबीन, कापूस यांसह अनेक हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या अनियमित पावसामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले असून, महसूल विभागाच्या वतीने अनेक भागात झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप झालेले नाहीत.