पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथे बुधवार दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शेतात मकवान गोळा करण्याच्या कारणावरून मुलाने वडिलांना कुऱ्हाडीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात सुखदेव दगडू चौगुले (वय 66 वर्ष यांनी) फिर्याद दाखल केली असून मुलगा प्रकाश सुखदेव चौगुले (वय 34 वर्षे, राहणार ईश्वर वठार, तालुका पंढरपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मुलाने दारूचे नशेत शिवीगाळ दमदाटी करून कुऱ्हाडीने मारहाण केली.