आज २४ ऑगस्ट रविवार रोजी राज्यातील सर्व पोलीस घटाकांमध्ये सायक्लोथॉन उपक्रम आयोजीत करण्यात आला, पोलीस आयुक्तालय अमरावती शहर च्यावतीने सायक्लोथॉन २०२५ चे १० किलोमीटर २५ किलोमीटर ५० किलोमीटर व १०० किलोमीटर .या गटामध्ये आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम सकाळी ०५.०० वा १०० की. मी. सायक्लोथॉनला रमेश घुमाळ पोलीस उपायुक्त (मुख्यालय) यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवुन सुरवात करण्यात आली. १०० की.मी. सायक्लोथॉन या गटामध्ये ३४ सायकलस्वारांनी सहभाग घेतला...