धुळे एसीपीएम मेडिकल कॉलेज नाला पुलावरून पाणी वाहत असल्याने हरणमळ गावाचा धुळे शहराशी संपर्क तुटला अशी माहिती 29 ऑगस्ट शुक्रवारी सायंकाळी पोपट पाटील यांनी दिली आहे. धुळे शहरात दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरलेला आहे. शहराला पाणीपुरवठा करणारा नकाणे दुसऱ्यांदा ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे एसीपीएम मेडिकल कॉलेज जवळ असलेल्या नाला पुलावरूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह खळाळून वाहत आहे. कालपासूनच जोरदार प्रवाह वाहत असल्याने नकाणे तलावाजवळील मुख्य पाईपलाईन फुटलेली आहे. पाईपलाईनचे ही न