शेंदोना गावाजवळचा पूल खचला, वाहतूक पूर्णपणे ठप्प.जिल्ह्यातील शेंदोना गावाजवळचा पूल पुरामुळं खचल्यानं पोहरादेवी ते शेंदोना या मार्गावरील वाहतूक पूर्ण बंद झाली असून शेंदोना येथील गावाकऱ्यांना तालुक्याला येणं कठीण झालय. काल सायंकाळी या भागात मुसळधार पाऊस झाला होता त्यामुळं नाल्याला पूर येऊन पूल पूर्णपणे खचला. गावाकऱ्यांना आता यवतमाळ जिल्ह्यातून ये जा करावी लागतेय. या पुलाची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी गावाकऱ्यांनी केलीये.