धनकवडीतील युवकाला बनावट पोलिसांकडून लुबाडणूक. धनकवडी येथे एका १९ वर्षीय युवकाला बनावट पोलिस असल्याची बतावणी करून फसविण्यात आले. ईशा लॉजमध्ये काल पहाटे आरोपी इसम व महिला यांनी पोलिस असल्याचे सांगत रजिस्टर तपासले व फिर्यादीला जबरदस्तीने गाडीत बसवून स्वारगेट परिसरात नेले. त्याला मारहाण, धमकी व शिवीगाळ करून मोबाईलमधून गुगल पे द्वारे ६ हजार रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करवून घेतले. पैसे काढून आरोपी फरार झाले. सहकारनगर पोलिस ठाण्यात कलम १३८, २०४, ३०९(६), ३५२, ३५१(२), ३(५) प्रमाणे गुन