खामगांव तालुक्यातील लाखनवाडा बुद्रुक येथील बस स्टँड येथे एकावर एकाने हल्ल्याचा प्रयत्न केल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजे दरम्यान उघडकीस आली आहे.याबाबत कडुबा उत्तम पांढरे वय 46 वर्षे राहणार लाखनवाडा बुद्रुक यांनी हिवरखेड पोलिस स्टेशनला तक्रार दिली की,विलास विश्राम पांडे याने आर्थिक देवाण-घेवाणच्या कारणावरून मला अश्लिल शिवीगाळ करून टोकदार गुप्तीसारख्या वस्तुने अंगावर मारण्यासाठी धावला व जीवे मारण्याची धमकी दिली.