गोंदिया पोलिस मुख्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त अवयवदानाची शपथ घेण्यात आली गोंदिया: 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गोंदिया पोलीस मुख्यालय येथे ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मा .पर्यटन, महिला व बालविकास मंत्री सन्मानीय मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यावर, त्यांनी उपस्थितांना अवयवदानाचा संकल्प करण्याची शपथ दिली. कार्यक्रमाला मा.जिल्हाधिकारी प्रजीत नायर तसेच जिल्ह्यातील अन्य पदाधिकारी आणि सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.