मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मांजरसुंबा येथील अंतिम इशारा बैठकीला दुपारी उशिरा सुरूवात झाली. या बैठकीस उपस्थित समाजबांधवांनी एकत्र येत मुंबईला धडकणार आणि आरक्षण घेवूनच परतणार असा निर्धार केला असून जरांगे पाटील सांगतील तोच शब्द आमच्यासाठी अंतिम असेल असेही मराठा समाजाने यावेळी ठणकावून सांगितले. दरम्यान बैठकीला स्व. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासह जिल्हाभरातील मराठा सेवक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.