गेल्या दहा दिवसांपासून श्री गणरायाच्या आगमनाने सर्वत्र चैतन्याचे व मंगलमय वातावरण होते. धार्मिक, प्रबोधनात्क कार्यक्रमांची रेलचेल सुरु होती. दहा दिवस गणरायाची मनोभावे पूजा, अर्चा व सेवा केल्यानंतर आज शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता समस्त गणेशभक्त जड अंतकरणाने लाडक्या बाप्पाला निरोप देताना दिसून आले. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... अर्धा लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला... असा जयघोष सर्वत्र ऐकू येत होता. सकाळपासून घरगुती प्रतिष्ठापना केलेल्या गणरायाचे विसर्जन करण्यासाठी भाविक नदीक