स्टेंट्रल बँक ऑफ इंडीया येथून बँकेत आलेल्या शेतकऱ्याची १ लाख २७ हजार रुपये असलेली पिशवी एका अज्ञात युवकाने लंपास केल्याची घटना १ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजे दरम्यान वडकीस आली आहे.नांदुरा रोडवरील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये किन्ही महादेव येथील शेतकरी शिवदास सुखदेव घ्यार वय ५१ वर्ष, यांनी १ लाख २७ हजार रुपयांची रोख रक्कम असलेली पिशवी ही बँकेच्या काउंटरवर ठेवली व फोन आला त्यावेळी त्यांनी फोनवर बोलत असताना बँकेच्या बाहेर गेले त्या वेळेत एका अज्ञात युवकाने ती पिशवी चोरून नेली.