: टिळक रोड येथील भारतीय स्टेट बँक एटीएममध्ये ७१ वर्षीय वृद्धाची एटीएम कार्ड बदलून तब्बल ८० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना २२ जुलै रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. फिर्यादी यांना मदत करण्याच्या बहाण्याने एका अनोळखी इसमाने त्यांच्याकडून एटीएम कार्ड घेऊन ५ हजार रुपये काढून दिले. मात्र हातचलाखीने खरे कार्ड व पिनकोड घेऊन त्यांना बनावट कार्ड परत केले. त्यानंतर मूळ एटीएम कार्डद्वारे ८० हजार रुपये काढून फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपीचा शोध सुरू आहे.