धुळे तालुक्यातील सोनेवाडी शिवारात शेताच्या कुंपणावरील विजेच्या तारेचा धक्का बसून ओंकार लालचंद माळीच (४५) यांचा मृत्यू झाला. शेतकरी प्रशांत जाधव यांनी संरक्षणासाठी लावलेल्या तारेत धोकादायकपणे वीज सोडल्याने हा प्रकार घडला. याप्रकरणी त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वी दह्याणे येथेही अशीच घटना घडली होती. तपास पोलीस उपनिरीक्षक छाया पाटील करत आहेत.