औसा - कुरेशी समाज, क्रांतिकारी शेतकरी संघटना तसेच शेतकरी, व्यापारी व शेतमजूर यांच्या वतीने औसा शहरात किल्ला मैदान येथून तहसील कार्यालयापर्यंत आज दि. 25 जुलै रोजी सकाळी 11 वाजता भव्य मुकमोर्चा काढण्यात आला. गोरक्षकांच्या नावाखाली जनावरांच्या वाहतुकीला मिळणारे अडथळे थांबविणे, मुस्लिम खाटीक आर्थिक विकास महामंडळ स्थापनेची मागणी, शेतमालाला हमीभाव यांसह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. शासनाने १५ सप्टेंबरपर्यंत दखल न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.