मागील चार वर्षांपासून भंडारा नगर परिषदेवर प्रशासक राज असल्याने भंडारा शहरातील जनतेच्या समस्या ऐकून घेण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. ज्यांना जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले. त्यांना सुद्धा जनतेच्या समस्या ऐकून घेण्यासाठी वेळ नाही. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने भंडारा शहरातील जनतेच्या घरासमोरील खराब रस्ते, नाल्यांची साफसफाई, इलेक्ट्रिकच्या समस्या, कामगारांचे दाखले, घरकुल, फेरफार, घर टॅक्स, यासह नगरपरिषद संबंधी तसेच तहसील कार्यालय संबंधित प्रलंबित...