अलिबाग ते वडखळ हा २२ किमीचा राष्ट्रीय महामार्ग (क्र.१६६ओ) अत्यंत दुरवस्थेत असून लाखो खड्डे, उंचवटे, वाकडे-तिकडे वळणं यामुळे प्रवास जीवघेणा बनला आहे. या रस्त्यामुळे वाहनधारक व प्रवाशांना शारीरिक, मानसिक तसेच आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करून खड्डेमुक्त करण्यात यावा, अशी मागणी निलेश शरद पाटील यांनी कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पेण तसेच रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.