इचलकरंजी व हातकणंगले तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये सार्वत्रिक हितास बाधक अशा स्वरूपाचे अवैध गुन्ह्यांना परिणाम देणाऱ्या इचलकरंजी परिसरातील कुख्यात असलेल्या बी के गॅंग या संघटित गुन्हेगारी टोळीला एक वर्षाकरिता कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केले असल्याची माहिती आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.