महाराष्ट्राची राजधानी मुंबईत येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला विरोध दर्शवण्यासाठी फलटण तालुक्यात ओबीसी समाजाच्यावतीने सोमवारी सकाळी साडेदहा वाजता पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शहरातील नाना पाटील चौकात रास्ता रोको करत फलटण-पुणे आणि फलटण-पंढरपूर मार्गावरील वाहतूक तब्बल एक तास रोखून धरण्यात आली.या आंदोलनादरम्यान, ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.