पारनेर तालुक्यातील कळस गावातील गणेश तुळशीराम गाडगे या तरुणाचा २ सप्टेंबर रोजी बिबट्याच्या हल्यात दुर्दैवी मृत्यू झाला असता आज ८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वा.खा.निलेश लंके यानीब प्रत्यक्ष कळस येथे जाऊन गाडगे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.खा.लंके यांनी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी तात्काळ चर्चा करून शासनाकडून मदतीसाठी सूचना दिल्या. त्यानुसार एकूण ₹२५ लाखांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.