राजाभोज कॉलोनी येथे 24 ऑगस्ट रोजी सायं. तान्हापोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी चिमुकले नंदी घेऊन कार्यक्रम स्थळी पोहोचले. अतिशय सुंदर वेशभूषा करून चिमुकले आपल्या नंदीसोबत कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भगवान भोलेनाथ याची पूजाअर्चना करून सुरू करण्यात आली. यावेळी स्वराज शानु राजीव ठकरेले पुन्हा एकदा पुरस्काराचे मानकरी ठरले. एवढी कॉलनीचे रूपचंद ठकरेले, उदय तुरकर, गोविंद बोपचे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येत परिसरातील नागरिक उपस्थित होते.