वरोऱ्यातील केसरी नंदन गणपती जवळ आरोपी अमोल नवघरे वय अंदाजे ३५ वर्ष रा.हनुमान वॉर्ड वरोरा ,व मृतक नितीन चुटे यांच्यात काही कारणावरून वाद झाला. मृतक नितीन हा साई मंगल कार्यालयाजवळ आला असता काही कळायच्या आत आरोपीने त्याचे मागे येऊन शस्त्राने शरीरावर सफासफ वार करून गंभीर जखमी केले.जखमी अवस्थेत उपचारार्थ दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. यावेळी पोलिसांनी आरोपी अमोल नवघरे ला अटक केली असून पुढील तपास वरोरा पोलिस करीत आहे.ही घटना आज दि ८ सप्टेंबर ला रात्री ८.३० वाजता घडली आहे.