Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 28, 2025
आज दि 28 ऑगस्ट सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजीनगरात शासकीय नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून दोघांना ३१ लाखांचा गंडा घातला. या प्रकरणी MIDC वाळूज ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रभावती सखाराम वाघ, पांडुरंग साबळे आणि संतोषकुमार शर्मा अशी आरोपींची नावे आहेत. तर मुंजाजी प्रभाकर वरकड यांनी याविरुद्ध तक्रार दिली आहे. आरोपींनी फिर्यादीचा चुलत भाऊ इंद्रजित वरकडला पुण्यातील भारती विद्यापीठात प्राध्यापक पदासाठी ३० लाख रुपयांत नोकरी देण्याचे आमिष दिले.