आज शनिवार सात सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की छत्रपती संभाजी नगर शहरातील मानाचा असलेल्या संस्था गणपती बाप्पाची विसर्जन आरती शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आले असून यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली आहे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आमदार संजय केनेकर यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी ढोल ताशाच्या तालावर ठेका धरल्याचे या ठिकाणी दिसून आले आहे, यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.