जीवनाच्या कोणत्याही परीस्थित परिवाराला सांभाळू शकते ती स्त्री आहे. कारण देवानी स्त्रीला एका शक्ती च्या रुपात जन्म दिला असून साधारण दिसणारी स्त्री आवश्यकता पडल्यास चंडीचा रूप धारण करू शकते. म्हणून स्त्री ने कधीच स्वतः ला कमजोर समजण्याची चूक करू नये. असे विचार डॉ. अश्विनी भोंडेकर यांनी व्यक्त केले. त्या शिवसेनेच्या महिला मेळावा व रक्षाबंधन कार्यक्रमास संबोधित करीत होत्या. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून आम. नरेंद्र भोंडेकर यांची उपस्थिती होती.