सोलार कंपनीत मोठा ब्लास्ट झाल्याने एकाचा मृत्यू झाला असून त्यात कर्मचारी देखील जखमी झाले आहे त्यांचा उपचार दंदे हॉस्पिटल येथे सुरू आहे. हॉस्पिटलचे डॉक्टर नुपाल दंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील यावेळी जखमींची विचारपूस करत हॉस्पिटल ला भेट दिली आहे. तसेच जखमींच्या परिवारांशी देखील त्यांनी संवाद साधला आहे.