केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम पालघर जिल्ह्यात प्रगतीपथावर आहे. महाराष्ट्रात प्रथमच पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील साखरे येथे फुल स्पॅन प्री- स्टेड्स काँक्रीट बॉक्स गर्डर बसवण्यात आला आहे. फुल स्पॅन लॉन्चिंग गॅट्रीच्या सहाय्याने 40 मीटर लांबीचा काँक्रीट गार्डन बॉक्स बसवण्यात आला असून याचे वजन 970 मॅट्रिक टन आहे. हा गर्डर भारताच्या बांधकाम उद्योगातील सर्वात जड गर्डर मानला जातो.