नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील शिवनी येथे, शेतात जुवा खेळून नका असे म्हटल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात खिशातील चाकू काढून यातील फिर्यादी इसमाच्या खांद्यावर मारून जखमी केल्याची घटना 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच ते साडे सहा वाजता च्या दरम्यान घडली आहे. याबाबत दीपक दादाराव ऊके यांनी 21 ऑगस्टला रात्री आठ वाजता नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. यातील आरोपी हे फिर्यादीच्या शेतात पत्ते खेळण्याकरिता बसले असताना फिर्यादी इसमाने तुम्ही येथे किंवा खेळू नका....