भद्रावती तालुक्यातील चेकबरांज ग्रामपंचायत क्षेत्राअंतर्गत असलेल्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी रविंद्र डोंगे यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्तीची प्रक्रिया ग्रामपंचायत उपसरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे बांधकाम सभापती राजु डोंगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रामसभेत पार पडली.अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल डोंगे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.