आडगाव या गावापासून जवळच सातपुड्याच्या कुशीत असलेल्या सातपुडा निवासणी आई मनुदेवी मंदिरात शनिवारी यात्रा उत्सव होता. सकाळपासूनच रिपरिप पाऊस सुरू होता. या पावसातच भाविक भक्तांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. सातपुड्याच्या हिरवळ वातावरणात निसर्गरम्य वातावरणात दर्शनासाठी महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात राज्यातून भावीक, भक्त या ठिकाणी दाखल झाले होते.