त्र्यंबकेश्वर रस्त्यावर अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाला आडगाव मेडीकल कॉलेज येथे मृत घोषित केलेला तरुण अंत्यसंस्काराच्या वेळी खोकला आल्याने जिवंत असल्याचे समजताच तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.रुग्णावर अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाचे शल्य चिकिस्तक डॉक्टर चारुदत्त शिंदे आणि कुटुंबीयांनी दिली.