सांगोला तालुक्यातील मांजरी हद्दीतील रेल्वे रुळाजवळ भांडणाचा आवाज ऐकून थांबलेल्या तरुणाला चौघांनी मारहाण केली. तू इथे कशाला थांबला, म्हणत शिवीगाळ दमदाटी करत एसटीपी पाईपने पाठीवर, हातावर, पोटावर मारले. एवढ्यावरच न थांबता दगड डोक्यात मारून जखमी केलं. सदरची घटना २७ रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडली. याप्रकरणी ज्योतिराम मोहिते वय १९ रा.देवकतेवाडी सांगोला यांनी पोलिसात तक्रार दिली असून धनाजी साळुंखे, प्रकाश साळुंखे, बापू साळुंखे, बापू वरेकर रा.देवकतेवाडी यांच्यावर गुन्हे नोंद केले आहेत.