जयसिंगपूर शहरातील सर्व भाजी विक्रेत्यांना महात्मा ज्योतिबा फुले भाजी मंडईमध्ये तात्काळ हलवावे,शहराला शिस्त लागावी आणि विकासाच्या नावावर सुरू असलेला अनागोंदी खर्च थांबावा,या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी प्रदेश संघटक मोबिन मुल्ला यांनी आज शुक्रवार दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 4 वाजता जयसिंगपूर नगरपरिषद व पोलीस प्रशासन यांना निवेदन दिले.कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली महात्मा ज्योतिबा फुले भाजी मंडई आजही रिकामी असून,तिथे मॉल उभारण्याचा डाव विद्यमान लोकप्रतिनिधींचा आहे.