राज्य शासनाच्यावतीने या वर्षीपासून महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा 'महाराष्ट्राचा राज्य उत्सव' म्हणून साजरा करण्यात येत आहे. या राज्य उत्सवाअंतर्गत गणेशोत्सव मंडळांसाठी आयोजित स्पर्धेत सहभागाची दि.२६ ऑगस्ट शेवटची तारीख आहे.जिल्ह्यातील मंडळांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.