आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मोर्शी पोलीस स्टेशन हद्दीतील येवती येथून राहत्या घरातून दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार रोहन जयदेव वानखडे राहणार येवती, यांनी दिनांक 21 ऑगस्टला दुपारी दोन वाजून 54 मिनिटांनी मोर्शी पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. दिनांक सहा ऑगस्ट ते सात ऑगस्ट सकाळी सात वाजेपर्यंत कुण्या तरी अज्ञात इसमाने दुचाकी चोरून नेली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून, दाखल तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे