दिघोरी मोठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे चक्क ताडपत्रीचा आधार घेत सुरू ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे. या आरोग्य केंद्रातील सर्वच खोल्या ह्या पाऊसाचा पाण्यामुळे झालेल्या गळतीमुळे जीर्ण झालेल्या आहेत. अनेक ठिकाणी स्लॅबवरील काँक्रिटचे खिपले खाली पडलेले दिसून येत आहेत. किंबहुना स्लॅबवर माकडांनी उड्या मारल्या तरी स्लॅबचे खाली खिपले पडतात अशी परिस्थिती आहे. मागील अनेक वर्षांपासून नवीन इमारतीची मागणी गावकऱ्याकडून होत आहे मात्र शासन याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे.