मराठा आणि ओबीसी समाजात वाद निर्माण करण्याचे काम जाणूनबुजून लक्ष्मण हाके करीत असल्याचा आरोप मराठा राज्य समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी केला आहे. हाके हे मागील काही दिवसांपासून मनोज (दादा) जरांगे पाटील यांच्यावर वारंवार खालच्या भाषेत टीका करीत आहेत. एकेरी उल्लेख करून केलेली ही टीका महाराष्ट्रातील समाजाला मान्य नाही, असे स्पष्ट करत काळकुटे यांनी संताप व्यक्त केला. काळकुटे म्हणाले की, "आम्ही हे वक्तव्य खपवून घेणार नाही. जो लक्ष्मण हाकेची जीभा हासाडेल त्याला एक लाख रुपयाचे बक्षीस देणार