पुणे येथील कोथरूड येथे एका पोलीस ठाण्यात जातीय अत्याचार करून मागासवर्गीय तरुणीला चुकीची भाषा वापरून या तरुणीला अपमानास्पद वागणूक दिल्याच्या प्रकरणी आज दि. ७ गुरुवारी दुपारी तीन वाजता पिंपळगाव बसवंत शहरातील नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त करत पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याला निवेदन देत अशा पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.