बैल पोळा सणाच्या निमित्ताने लहान बालकांना बैलांचे महत्त्व व बैलाविषयी आदर निर्माण व्हावा या उद्देशाने तान्हा पोळा साजरा करण्याची प्राचीन परंपरा आहे. याच परंपरेनुसार आज दि. 23 ऑगस्ट रोज शनिवारला सकाळी 11 वा. मोहाडी तालुक्यातील आंधळगाव मलिदा रोड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी लहान मुलांनी लाकडी नंदी सजवून तान्हा पोळ्यात आणली होती. याप्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकारी व गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.