हुपरी परिसरात बिबट्याचा वावर असल्याची शक्यता वर्तवली जात असून,याबाबत खात्री करण्यासाठी वनविभागाने गेली दोन दिवस कंबर कसली आहे.प्राणिमित्रांच्या मदतीने गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी पुन्हा रात्रभर थर्मल ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने शोधमोहीम राबवण्यात आली.मात्र बिबट्या किंवा वाघाचे पावलांचे स्पष्ट ठसे आढळले नाहीत. दरम्यान,सांगवडे–पट्टणकोडोली रस्त्याच्या बाजूला काही ठिकाणी पावलांचे ठसे आढळून आले असून,यामुळे प्राणी त्या दिशेने गेला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.