आज २७ ऑगस्ट बुधवार रोजी दुपारी १ वाजता धामणगाव रेल्वे मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे युवा आमदार प्रताप अडसड यांची अमरावती येथील निवासस्थानी बाप्पाचे आगमन होऊन श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. मनोभावे पूजा करून श्रीगणरायाचे दर्शन घेतले आणि सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती व उत्तम आरोग्य लाभो अशी बाप्पाच्या चरणी आमदार प्रताप अडसड यांनी प्रार्थना केली..