इचलकरंजीत गणपती विसर्जनासाठी निघालेल्या गणेश भक्तांना वाहतुकीच्या विस्कळीत व्यवस्थेमुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. उत्तम प्रकाश चित्रमंदिर ते पंचगंगा नदीपर्यंत बुधवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजता वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने काही भक्तांना आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला गाडीत ठेवून तब्बल दोन तास बसून राहावे लागले.गेल्या सात दिवसांपासून घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांमध्ये मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला.