निलंगा, शिरूर अनंतपाळ व देवणी तालुक्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी होऊन सोयाबीनच्या पिकात पाणी थांबले आहे व सोयाबीनला लागलेल्या शेंगा पूर्णतः नासून गेलेल्या आहेत. तरीपण प्रशासन, शासन, लोकप्रतिनिधी शेतकऱ्याकडे बघायला तयार नाहीत. शासनाने तात्काळ सरसकट पंचनामे करून शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शेतकरी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.