धुळे शहरातील जेल रोड येथील लक्ष्मी देवी वस्तीगृह बंद खोलींना 9 सप्टेंबर मंगळवारी सायंकाळी सव्वा सहा ते साडेसहा वाजेच्या दरम्यान अचानकपणे आग लागली. धुराचे लोट बाहेर येत असल्याने आग लागल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी महानगरपालिका अग्निशामक दलाला माहिती दिली. महानगरपालिका अग्निशामक दलाला आगीची माहिती मिळताच तातडीने काही मिनिटातच महानगरपालिका अग्निशामक दलाचे पाण्याचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी लक्ष्मी देवी वस्तीगृह बंद खोलीत आग लागल्याने खोलीत कागद जळत होते.ला