बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदिरा आवास येथे पोलिसांनी छापा टाकून रईस खान रफिक खान (50) याला दोन धारदार तलवारींसह ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सुहास गोसावी, फराज शेख, हवालदार राजेश जोंधळकर, पोलीस शिपाई अमोल हाके आणि सुम्मैया मोहम्मद यांच्या पथकाने केली. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.