तुमसर पंचायत समितीचे माजी सभापती नंदू रहांगडाले यांनी आज दि. 13 सप्टेंबर रोज शनिवारला दुपारी 1 वा. मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात माजी खा. प्रफुल पटेल व तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आ. राजू कारेमोरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात पक्षप्रवेश केला. यावेळी तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र प्रमुख देवचंद ठाकरे, बबलू रहांगडाले, यासीन छवारे,हरीश पटले, रोशन बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.