शिरपूर रस्त्यावर दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत 37 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी 28 ऑगस्ट रोजीगुन्हा नोंद करण्यात आला. या अपघातात अनिल देविदास कोळी वय 37, रा. खर्दे याचा मृत्यू तर गणेश सखाराम कोळी रा. खर्दे गंभीर जखमी झाला आहे.सदर अपघात हा 22 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शिरपूर वाघाडी शिरपूर रस्त्यावर अमृत विहार लगत झाला होता.पुढील तपास पोहेकॉ प्रमोद ईशी करीत आहे.