यावल येथील तहसील कार्यालयामध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी समाज बांधवांनी एकत्र येऊन निवेदन दिले. तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे समतेचे तालुकाध्यक्ष नितीन सोनार सह मान्यवरांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठा आरक्षण संदर्भात महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅझेटचा काढलेला जीआर रद्द करावा अशी त्यांची मागणी आहे.